

आपल्यापैकी बरेच जण Paytm ,Freecharge यांसारखे M Wallet (मोदींच्या भाषेत इ-बटवा) वापरत असतील. या M Wallet चा मेन प्रॉब्लेम आहे कि यात पैसे टाकून आपल्याला खर्च करावे लागतात .आणि समोरचा विक्रेता आपल्याकडे असलेले M Wallet च वापरत असेल याचा काय भरोसा .अशा वेळी इच्छा असूनही आपण कॅशलेस व्यवहार करू शकत नाहीत मग शेवटी हात खिशाकडे वळतो. भारतात युनिव्हर्सल वापरात असेल आणि ज्या अँप्स मधून कोणीही पैसे स्वीकारू शकतो किंवा घेऊ शकतो असं काहीतरी पाहिजे होतं असं वाटत पण भारत सरकार ने दिलेली UPI हि अशीच सुविधा भारतात जन्माला आली.जिच्याने कोणीही कोणालाही पैसे देऊ शकतो आणि घेऊ शकतो.
१. UPI म्हणजे काय ?
UPI (यूनिफाईड पेमेन्ट इंटरफेस) म्हणजे स्मार्टफोन च्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवण्याची सोप्पी साधी पद्धत.(भारतात असलेली सर्वात सोपी पद्धत म्हटली तरी चालेल ) .हि सुविधा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी भारतातल्या २१ राष्ट्रीयकृत बँकांच्या सौजन्याने दिली आहे .जिचे सर्व व्यवहार NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्यादेखरेखी खाली चालतात .
२.एम वॉल्लेट आणि UPI मध्ये काय फरक आहे ?
M wallet खाजगी कंपन्या चालवतात . UPI हि सुविधा सरकार चालवते यात अँप खाजगी किंवा बँकांचे असू शकतात पण आपल्याला त्या अँप मध्ये पैसे टाकावे लागत नाहीत जे काही होते ते थेट Bank Accout ते Bank Account .
उदा. आपण Paytm वापरत असू आणि एखादा Paytm स्वीकारणाऱ्या चहावाल्याला आपल्याला पैसे द्यायचे असतील तर आपल्याला आधी आपल्या बँक खात्यातून Paytm ला पैसे टाकावे लागतील मग त्याच्या paytm ला द्यावे लागतील . आणि वर त्याला त्याचे paytm चे पैसे बँकेत टाकायला १.५% रक्कम comission म्हणून द्यावी लागेल.मात्र UPI मध्ये एवढं घुमावफिरावं नसतं .UPI चे सर्व व्यवहार हे मोफत असून UPI ला एकदा का आपण आपलं Credit किंवा Debit कार्ड link केलं कि आपल्या बँकेतून पैसे थेट समोरच्याच्या बँकेत पैसे टाकू शकतो .म्हणजे मध्ये कुठल्या wallet ची गरज नाही किंवा बँकेत पैसे येण्यासाठी कुठले commision देण्याची गरज नाही.
1) M Wallet :- Wallet( (ग्राहक) -> Wallet (विक्रेता ) -> बँक ( विक्रेता )
2) UPI:-
( ग्राहक ) बँक -> ( विक्रेता ) बँक.
M wallet आणि UPI मधला मूळ फरक आणि महत्वाचा फरक हा आहे कि स्मार्ट फोन वर असणाऱ्या कोणत्याही बँकेच्या UPI अॅप वरून कोणत्याही बँकेच्या UPI अॅप वर पैसे पाठवता येतात .यात M wallet सारखे त्याच कंपनी चे अॅप वापरण्याचे बंधन नसते.
३. UPI अॅप कसे आणि कुठून डाउनलोड करायचे ?
UPI हि सुविधा सध्या भारतातल्या २१ बँका देतात . सोप्पे सांगायचे तर या २१ बँका एकमेकांमधले आर्थिक व्यवहार UPI च्या माध्यमातून निशुल्क करण्याची सुविधा देतात . या बँकांचे UPI अॅप प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत .
प्ले स्टोर वरील UPI अॅप्स च्या लिंक
SBI Pay -
https://play.google.com/store/apps/details?id=com.sbi.upi
हे अॅप्स UPI अँप्लिकेशन सुविधा देतात . यात आपण कोणत्याही बँकेचे खातेधारक असलो तरी देखील कोणत्याही बँकेचे UPI अँप वापरू शकतो .आणि कोणत्याही UPI अँप ने कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे टाकू शकतो .
४. UPI अॅप कसे वापराल ?
मी जे अॅप वापरतोय त्यावरून सांगतो . मी SBI Pay हे UPI अॅप वापरतो.तसे UPI चे सर्वच अॅप सारखे असतात फक्त बँके प्रमाणे अॅप चे रंग बदलतात :D .कोणतेही upi अॅप download केल्यावर पुढील प्रक्रिया कराव्या लागतात.
५. UPI ने पैसे कसे द्याल ?
UPI ने पैसे देण्याच्या ३ पद्धती आहेत .१.मोबाईल नंबर २.VPI ने ३.बँक अकाउंट नंबर ने .
send money व क्लिक केल्यावर हे तीनही पर्याय दिसतील.ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर UPI वर असेल तर मोबाईल नं वर किंवा समोरच्या कडे VPI असेल तर तो टाकून किंवा थेट बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC code टाकून पैसे थेट समोरच्या व्यक्तीच्या खात्यात टाकता येतात .कमीत कमी १ रुपयापासून ते जास्तीत जास्त २ लाखापर्यंत रक्कम UPI मधून पाठवता येते.
६.VPI-म्हणजे अकाउंट नंबर च छोटं नाव .?
VPI हि एक गमतीशीर गोष्ट आहे . ज्यांना सारखा सारखा बँक अकाउंट नंबर सांगायचं कंटाळा येतो त्यांच्या साठी VPI हि एक सहज सोपी आणि गोष्ट आहे nikhil12jadhav@gmail.com हा जसा माझा ई-मेल आयडी याचा जगात कोणीही पुनर्वापर करू शकत नाही तसाच व्हर्चुअल पेमेन्ट आयडी असतो . हा एकदा ज्याचा झाला कि पुन्हा कोणाला तो घेता येत नाही .म्हणजे nikhiljadhav@sbi नावाने आता कोणालाही VPI मिळणार नाही. म्हणजे माझी ओळख हि माझीच राहील. हा VPI आपल्या बँक खात्याशी जोडला जातो म्हणजे जेव्हा कोणीही nikhiljadhav@sbi या VPI वर पेमेन्ट करेल ते थेट माझ्या बँक खात्यात येईल . इतकं सोप्पं आहे . म्हणजे ना ifsc code सांगायची गरज ना बँक अकाउंट नंबर सांगायची गरज . यामुळे खाते क्रमांकाचा अवैध वापर होणे बंद होते हा देखील एक फायदा असतो.
७.मुख्य प्रश्न . UPI किती सुरक्षित ?
मी आत्ताच एक आर्टिकल The Hindu ला वाचलं त्यात हा प्रश्न होता .तर त्याचं उत्तर होतं
"The security is ful-proof as the transaction will happen in a highly encrypted format. Already NPCI’s IMPS network handles more than Rs.8,000 crore worth of transactions a day, which will exponentially increase with the use of mobile phones.
म्हणजेच NPCI (नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) हि या आधी देखील दिवसाला ८ हजार कोटी online व्यवहार नियंत्रित करत होती अशी व्यवस्था किती सुरक्षित असते हे आपणच समजून घ्यावे .
तसेच आता आधार कार्ड देखील UPI मार्फत जोडली जाऊन फक्त आधार कार्ड (नंबर) वरून बँक व्यवहार शक्य आहे.
मला वाटत कि तुम्हाला हि माहिती पुरेशी असेल मी सध्या हाच प्रयत्न करतोय कि देशात सुरु असलेल्या ह्या कॅशलेस अभियानाला हात भर कसा लावता येईल जेव्हापासून UPI हे तीन अक्षर ऐकायला आलेत सर्वांना कुतूहल होतं .आणि तुमचं निरसन झालं असेल असं समजतो . M wallet पेक्षा किती तरी जास्त सोयीची आणि सोप्पी प्रक्रिया UPI देतं जगात प्रत्येक देशाची एक payment सिस्टिम आहे . अमेरिकेकडे अँड्रॉइड आणि apple pay आहेत . चीन कडे त्यांची पेमेन्ट सिस्टिम आहे .आपल्या तंत्रज्ञानाच हे श्रेय आहे कि आपण आपली स्वदेशी आणि सुरक्षित अशी एक पेमेन्ट सिस्टिम बनवली आहे.भारतात एक "युनिव्हर्सल पेमेन्ट सिस्टिम" आली आहे .आणि हि शाश्वत आहे हे महत्वाचं .ऐकण्यात तर असही आलाय कि यामुळे M wallet बंद व्हायची वेळ येईल पुढच्या काही वर्षात . मुख्य म्हणजे हि सुविधा सोपी आणि सरळ आहे . तुम्हीही तुमच्या डेबिट कार्ड च्या साहाय्याने UPI पेमेन्ट method सुरु करून देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यास मदत करा एवढेच आवाहन .
+91 942 121 9480 (WhatsApp)
+91 787 533 0269
Tanvi Apartment, Vidyanagar, Behind Kranti Clinic, Civil Hospital Road, Gaonbhag, Sangli, Maharashtra.(416416)